IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज

IPL Final | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा अंतिम सामना काल पावसामुळे रद्द झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. पावसामुळे (Rain) हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळवला जाणार आहे. पण रविवारी जसा पावसाने धुमाकूळ घातला तसा सोमवारी देखील पाऊस धुमाकूळ घालणार आहे का? याचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.

Will it rain on the reserve day of the IPL final?

काल (28 मे) संपूर्ण अहमदाबाद शहरामध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे रविवारी पाऊस थांबायची चिन्ह नव्हती. परिणामी आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) रद्द करावा लागला. रविवारी 60 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. तर हवामान खात्याचा अंदाज शंभर टक्के खरा ठरला आहे. त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या सोमवारच्या अंदाजाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवारी शहरातील वातावरण ढगाळ असेल. त्याचबरोबर तीन टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये रविवार एवढा पाऊस सोमवारी नक्कीच पडणार नाही. मात्र, सोमवारी देखील  पाऊस आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) रद्द करू शकतो.

दरम्यान, आयपीएलमध्ये एकूण 74 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 70 लीग मॅच स्टेज आणि चार प्लेऑफ सामने (IPL Final) होते. लीग सामने खेळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले होते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/426mFha