IPL vs PSL | आयपीएलबद्दल मोहम्मद रिझवानने केलं खळबळजनक विधान, म्हणाला…
IPL vs PSL | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात मोठी खेळली जाणारी क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेमध्ये फक्त खेळाडूंना करोडो रुपये नाही, तर खेळण्याची संधी देखील मिळते. या स्पर्धेद्वारे प्रेक्षक जगभरातील स्टार खेळाडूंना एकत्र खेळताना बघू शकतात. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाच्या संबंधामुळे पाकिस्तानचे खेळाडू या लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohommad Rizwan) चा असा विश्वास आहे की पाकिस्तान सुपर लीग ही इंडियन प्रीमियर लीगपेक्षा चांगली लीग आहे. पाकिस्तानच्या या खेळाडूने टी-20 लीगची तुलना करत पीएसएल अधिक मजबूत असल्याचे सांगितले आहे. याबद्दल बोलताना रिझवान म्हणाला आहे की,”पीएसएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू पाकिस्तान संघांमध्ये राखीव खेळाडू आहे. पाकिस्तानी खेळाडूंसह पीएसएलमध्ये सहभागी होणारे परदेशी खेळाडू देखील या लीगला सर्वात कठीण लीग मानतात.”
पुढे बोलताना मोहम्मद रिजवान म्हणाला की,”इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पेक्षा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) जास्त मोठी आहे. पाकिस्तानच्या या टी-20 लीग मध्येराखीव खेळाडू बाकावर बसतात.” पुढे तो म्हणाला की,”पीएसएलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना देखील बाकावर बसवतात, म्हणून ही जगातील सर्वात कठीण क्रिकेट लीग आहे. पीएसएलने संपूर्ण जगाला चकित केले आहे. पीएसएलमध्ये आम्हाला यश मिळणार नाही असे सुरुवातीला आम्हाला खूप ऐकावे लागले होते. पण एक खेळाडू म्हणून आम्ही आज जगभरात नाव कमावले आहे.”
मोहम्मद रिझवान हा पाकिस्तान संघातील खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. हा खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचे योगदान देतो. गेल्या वर्षी झालेल्या सर्वसामान्यांमध्ये मोहम्मद रिझवानने महत्त्वाची खेळी खेळली होती. तर टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- Sudha Murti | श्रेया घोषाल संग ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर थिरकल्या सुधा मूर्ती, पाहा व्हिडिओ
- Sanjay Raut | …तर राज्यावर महाराष्ट्रद्रोही सरकार बसलेले आहे ; संजय राऊत यांची टीका
- Gandhi Godse Ek Yudh | ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार राजकुमार संतोषीचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’
- Eknath Shinde | “महापुरुषांमध्ये साधू संत येत नाहीत का?”; शिंदे गटाचा महाविकास आघाडीला सवाल
- Sanjay Raut | लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांवर बंदी असेल तर जाहीर करा- संजय राऊत
Comments are closed.