InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

इराणने पाकिस्तानला दिली घरात घुसून कारवाई करण्याचा धमकी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया नंतर आता इराणनेही पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने, इराणने पाकिस्तानला थेट धमकी दिली आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कमांडचे जनरल कासीम सोलेमनी यांनी, पाकिस्तानला ठणकावत म्हटले की, तुमच्या आजूबाजूच्या देशातील सीमा अंशात असण्यामागे तुम्ही कारणीभूत आहात. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस पाऊल न उचलल्यास इराण घुसून कारवाई करेल, असा धमकी वजा इशाराही इराणने पाकिस्तानला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.