Irfan Pathan । ‘विराटने फटाके तर कालच फोडले होते’; इरफान पठाणने शेअर केला व्हिडिओ

Irfan Pathan । नवी दिल्ली : भारताच्या (IND vs PAK) पाकिस्तानविरुद्धच्या जबरदस्त विजयानंतर फक्त विराट कोहली याचीच चर्चा होत आहे. त्याने ज्या प्रकारे भारतीय संघाला विजयापर्यंत नेले, त्यावरून तो जगातील नंबर वन फलंदाज का आहे हे त्याने स्पष्ट केले. विराट कोहलीने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या आणि भारताला 4 गडी राखून विजय मिळवून दिला.

कोहलीने आपल्या डावात चार षटकार मारले, ज्यात वेगवान गोलंदाज हारिस रौफने 19व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारले. भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने भारताच्या रोमहर्षक विजयानंतर एक व्हिडीओ शेअर केला. इरफान पठाणने दिवाळीवर एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन लिहिले, फटाके कालच फोडले गेले. आज सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. सर्वांना खूप खूप प्रेम, असं पोस्टमध्ये म्हंटल आहे. इरफान पठाणे विराट कोहलीला मिठी मारून त्याला अलगत उचलले होते. या व्हिडिओतून पठाणच कोहलीबद्दलच प्रेम दिसून आलं.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. शेवटपर्यंत क्रीजवर राहून संघाला विजय मिळवून दिला. चाहत्यांना जुन्या विराट कोहलीची झलक पाहायला मिळाली. ज्या वेळी टीम इंडियाच्या चार विकेट अवघ्या 31 धावांवर पडल्या होत्या, तेव्हा हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी पाचव्या विकेटसाठी 113 धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला सामन्यात पुनरागमन केले. हार्दिक आणि विराटची ही भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.