अजितदादांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ‘ते’ पत्र चोरणे नैतिक की अनैतिक?

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी नाट्यमयरित्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. तसंच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जात राष्ट्रवादीचे गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. माझ्याकडे आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे, असं अजित पवारांनी तेव्हा आम्हाला सांगितल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

पुढे ‘शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच जुनं झालं तरी खोट आहे ते खोटंच, असा हल्लाबोलही चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘संभाजीराजेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करत आहोत. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप स्वत:चा झेंडा न घेता या आंदोलनात उतरेल हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी आम्ही उभे राहू. महाराज तर आमचे नेते आहेत. आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा