“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक बैठक घेतली असून त्यात काही पर्याय सूचवले होते. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. राज्य सरकारने जी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती ती सरकारने पगारासाठी मदत केली होती.

तसेच, पाच राज्यांच्या वेतनाचा विचार केला तर गुजरातमधील वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे आणि इतर राज्यात जास्त आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी उत्तर देणं टाळलं. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला आहे.

यानंतर सरकारच्या या निर्णयानंतर आता अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. मागील 15 दिवसांपासून संप करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची प्रमुख मागणी मांडली होती. पण सरकारनं न्यायालयाच्या समितीचा हवाला देताना समितीचा अहवाल येईपर्यंत आपण विलीनीकरण करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी सरकारचा निर्णय मान्य आहे का? सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर यांची फसवणूक झाली आहे. आजची रात्र आम्ही आझाद मैदानावरच घालवणार आहे. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करुन आंदोलनाची पुढील दिशा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करु, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा