InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्याचे मंत्रिमंडळ आहे की अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी?

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. घोटाळेबाज मंत्री आणि त्यांना क्लीन चीट देणारे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून राज्याचे मंत्रिमंडळ आहे की अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे अशा शब्दात सावंत यांनी टीका केली आहे.

इतकेच नाही तर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे का? असा सवाल करून बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही सावंत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.