हीच उपकाराची परतफेड आहे का? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे निष्ठावंत शिवसैनिक असेलल्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कोरोना काळात सिंधुदुर्गावर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात अन्याय झाल्याचा आरोप राणेंनी केला आहे. राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

कोलगाव ग्रामपंचायततर्फे तयार करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी वाटत नाही, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, शिवसेनेला स्थापनेपासून साथ देणाऱ्या सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड? असा सवालही राणेंनी मुख्यमंत्र्यांना केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा