शपथनामा हर्बल वनस्पती घेऊन लिहिला नाही ना?, सुधीर मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे. माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर हल्ला केला आहे.
शरद पवार स्वतः आणि अनिल परब यांनीही एसटी कामगारांना राज्य व केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ असे सांगितले. तुम्ही शपथनामा कोणती हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन लिहिला नाही! मग, जे सांगितले त्यावर कृती करा, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
एसटी कामगारांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही आपल्या शपथपत्रात ‘हे निश्चित देऊ’ असे म्हटले आहे. शरद पवार स्वतः आणि अनिल परब यांनीही एसटी कामगारांना राज्य व केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ असं सांगितलं. मग अशा प्रसंगात जे तुम्ही सांगितलं त्यावर कृती करणं महत्त्वाचं आहे. असं मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील महाविद्यालये सुरु राहणार कि बंद ?, यावर उदय सामंतांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
- ‘कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याला भाजप जबाबदार’
- नवीन वर्षात आघाडी सरकारला घालवायचे; रामदास आठवलेंचा संकल्प
- गल्लीत क्रिकेट जिंकणारे वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल
- राज्यात नवे निर्बंध लागू, बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमांना मुरड घालायला हवी; अजित पवारांचे आवाहन
You must log in to post a comment.