“चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात, असं कानावर आलंय”

रत्नागिरी : राज्यात भाजप आणि महाविकासाआघाडीमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप सुरु असतात. तसेच राज्यातील राजकीय वातावरण सध्या केंद्रीय तपास यंत्रणाभोवती फिरताना दिसत आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते भाजपवर सातत्याने करत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दांत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलंय. जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर व इतर प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करत आहेत मात्र त्यांना इतकं महत्त्व देण जरुरी नाही. भारतात इतक्या संख्येने लोकसंख्या असूनही शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रस आणि काॅंग्रेस पक्षातील लोकांना केंद्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करत आहे. त्यामुळे बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील काही नेते सांगतात, की भाजपमध्ये आल्यावर चांगली झोप लागते. त्याचा अर्थ असा आहे की भाजपमध्ये गेल्यावर सगळ्यांना अभय आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा