“प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे”; अनुपम खेर यांचा मोदी सरकारला टोला

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्य वाढल्याने गांभीर्याचे वातारण निर्माण झालंय. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खरं तर अनुमप खेर हे मोदींचे प्रशंसक मानले जातात. मात्र देशातील सध्य परिस्थिती पाहून अनुमप खेर यांनी मोदी सरकारवर पहिल्यांदाच खुलेआम टीका केलीय.

“कोव्हिडमुळे देशात सध्या जी स्थिती निर्माण झालीय त्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीत प्रतिमा बनवणं नाही तर जीव वाचवणं जास्त गरजेच आहे हे सरकारला लक्षात घ्यायला हवं.सरकारच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनात चूक झाली आहे. मात्र इतर राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी या चुकांचा फायदा घेऊ नये.” असं म्हणत अनुपन खेर यांनी सरकारला दोष दाखवून दिले आहेत.

या मुलाखतीत पुढे ते म्हणाले, “सरकारने आता या आव्हानाचा सामना करणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्यासाठी काही करण्याची आता वेळ आलीय.” असं ते म्हणाले.

“सध्या आपण समस्या, वेदना, राग,निराशा अशा गोष्टींचा सामना करतोय. ते सहाजिक आहे. अनेक लोक म्हणतात मी खूप आशावादी आहे. पण माझ्याकडे त्याशिवाय पर्याय नाही. सध्या संपूर्ण जग या समस्येचा सामना करतंय.” असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा