“पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक”

मुंबई : साकीनाका येथे बलात्कार झालेल्या महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अतिशय अमानुष पद्धतीने पीडितेवर अत्याचार झाला होता. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे .यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. असे शिवसेनेनं म्हटले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण डोळ्यात पाणी आणण्यासारखं आहे, मात्र नकाश्रू ओघळू लागले की प्रकरणाचं गांभीर्य नष्ट होतं, असं देखील शिवसेना नेते खासदार संजय राऊत सामानातून म्हणाले आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.

कित्येक महिने मंत्रालयाची पायरी न चढणाऱ्या तसेच कायम घरी बसणाऱ्या नेत्याला ब्येष्ट मुख्यमंत्री ठरवणारे मुखपत्र, पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणं हे स्वाभाविक असं म्हणत निर्लज्जपणा दुसरं काय, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे राज्य सराकरवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा