InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

EVM हॅक होऊ शकतं हे खरंय…!!! पाहा व्हीडिओ

- Advertisement -

ईव्हीएम कसे हॅक केले जाऊ शकते याचं प्रात्यक्षिक अमेरिकन एक्स्पर्टने करून दाखवलं. अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे देशात एकच खळबळ माजली आहे. आज लंडनमध्ये एक प्रेझेंटेशन झाले त्यात या एक्स्पर्टने ईव्हीएम हॅक कसे केले जाऊ शकते, याची माहिती दिली.  भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना याबाबत माहिती होती, त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असंही एक्स्पर्टने सांगितलं आहे.

दरम्यान, गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे. सय्यद शुजा याने लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत हा दावा केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स झाल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला नव्हता असा  खळबळजनक दावा शुजा या सायबर एक्सपर्टने केला आहे. आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो असेही त्यानं सांगितले. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा दावा  शुजाने केला आहे.

- Advertisement -

Geplaatst door Niranjan Takle op Maandag 21 januari 2019

दिल्लीमधल्या २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.