‘पंतप्रधान 20-30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदजनक’

मुंबई : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार चांगलीच कोंडी करत आहे. सीमा भागातील रस्त्यावर कॉक्रिटचे पक्के अडथळे उभारुण रस्ते बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

यांनतर देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. ‘देशाचे पंतप्रधान 20-30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदजनक,’ असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज जे शांततेत आंदोलन आहे ते जर वाढलं तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल. हे सरकार संवेदनशील नाही. शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. जर चर्चा झाली असती तर आंदोलन इतकं वाढलं नसतं.’ अशी टीका शरद पवार यांनी आज केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा