“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

रिहानासह काही परदेशी सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

सचिनच्या या ट्विटनंतर ज्या सचिनच्या खेळावर समस्त देशावासियांनी भरभरुन प्रेम केलं त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात उद्गार काढले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय.

राष्ट्रीय जनता दल आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकऱ्यांना ट्वीटचं राजकारण येत नाही. त्यांना ग्रेटा थनबर्ग किंवा पॉपस्टार रिहानाबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मैदानात उतरावं हा देशाचा अपमान आहे, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला होता, तेव्हा आपण विरोध केला होता, असं शिवानंद तिवारी यांनी सांगितलं आहे. सचिनसारख्या व्यक्तीला भारतरत्न देणं चुकीचं होतं. भारतरत्नने सन्मानित व्यक्त विविध वस्तूंच्या जाहिराती करत नाही. हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान आहे, असंही शिवानंद तिवारी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा