कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल, पण शिवसैनिकांमध्ये माज पाहिजे ; संजय राऊत

अहमदनगर : नगरच्या येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असं राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असं सांगितलं. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी यावेळी बोलाताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर देखील टीका केली. शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची शिवसैनिक हीच ओळख राहते. त्यात काही बदल होत नाही.

हा नारायण राणे…तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे असंच म्हटलं जातं, असा टोला राऊतांनी राणेंना लगावला आहे. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना गडचिरोलिला पाठवू का असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार आहे. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतात, असं राऊतांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा