“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवारांकडे कोणती उंची आहे त्यांनी सांगावं”
मुंबई : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती. तसेच राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पुढे आणले जात आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावर अशा घडामोडी सुरू असताना स्वत: शरद पवार यांनी मात्र आपण या पदासाठी स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं होत. मात्र यानंतर आता या सर्व पार्श्वभूमीवर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलाय.
राष्ट्रपती पदासाठी एकमताने राष्ट्रवादीचे अध्यभ शरद पवार यांचं नाव घेण्यात येत आहे. राष्ट्रपती पदासाठी एक उंची असावी लागते. शरद पवार यांना उगाच चर्चेत आणलं जात आहे. अनेक वेगवेगळ्या जांगासाठी परिक्षा घेण्यात येतात. राष्ट्रपती पदासाठी एक विशिष्ट बौद्धिक पातळी लागते. त्यामुळे शरद पवारांनी ठरवावं त्यांच्याकडे कोणती उंची आहे आणि या पदावर जायचं की नाही, असंही ते पुढे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”
- ”शरद पवारांसारखा नेता राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल”
- विजयी गुलाल भाजपचाच : ‘राज्यसभेचा शिल्लक गुलाल विधान परिषदेच्या निकालानंतर उधळणार’
- अजितदादांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन; शनिवारी मुंबईत पोहचण्याचे आदेश
You must log in to post a comment.