InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘अरेरावी करण्याचा हेतू नव्हता’; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

- Advertisement -

संयम सुटल्याने केलेल्या अरेरावीबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अरेरावी करण्याचा हेतू नव्हता, शिरोळमधील घटनेची वस्तुस्थिती समजून घ्या, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं. पूरग्रस्तांनी तक्रारी करण्यास सुरुवात केल्याने पाटील यांनी त्यांना झापलं होतं

तक्रारी केल्याने काहीच साध्य होत नाही. उलट प्रशासनाचे मनोबल कमी होते. त्यामुळे तक्रारी न करता योग्य त्या सूचना कराव्यात. त्यावर आपण मार्ग काढू, असं आवाहनही मी केलं होतं. मात्र एक तरुण वारंवार उठून व्यत्यय आणत होता. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आपणाला सर्व काही देणार असल्याचंही सांगितलं. पण तो हेतूपुरस्सर व्यत्यय आणत होता, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना, पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनीही तक्रार करणाऱ्या पूरग्रस्तांना झापण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही तक्रारी करु नका, सूचना करा. तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पुरात बुडालेल्या पुलाची शिरोली या गावात हा प्रकार घडला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.