“शरद पवार पावसात भिजले त्याची बातमी झाली, पण शेतकरी भिजतोय हे पाहायला पवारांना वेळच नाही”

तुळजापूर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खूप वेगवेगळ्या गोष्टी अखंड महाराष्ट्राने पहिल्या. या निवडणुकीत केंद्रस्थानी होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. २०१९ ला शरद पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यावेळी या सर्व निवडणुकीचा टर्निग पॉईंट ठरला ती साताऱ्यातील पवारांची पावसातील सभा.

सातारा येथे श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार स्टेजवर भाषण करायला गेले असता तिथे जोरदार पाऊस आला होता. पाऊस सुरू असताना शरद पवारांनी भाषण केलं होतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय बनला. मात्र आता याचाच आधार घेत भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट शरद पवारांवर हल्ला चढवला आहे.

अभिमन्यू पवार यांनी झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी यासाठी औसा ते तुळजापूर पायी दिंडीचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार हे पावसात भिजले त्याची बातमी झाली तसेच शेतकरी भिजतोय त्याचीही बातमी झाली, पण शरद पवारांना शेतकरी भिजतोय हे पाहण्यासाठी वेळच नाही, असा टोला अभिमन्यू पवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा