‘महाराष्ट्रात अबकी बार किसकी सरकार’; काँग्रेसचा फडणवीसांना टोला

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. ज्यांनी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार असा नारा दिला आज त्या पक्षाला महाराष्ट्रात अबकी बार किसकी सरकार असं म्हणण्याची वेळ आली आहे असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपाला लगावला आहे.

यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं. मात्र या दोघांच्या अहंकारामुळे राज्यात सत्तास्थापन होऊ शकले नाही. भाजपाचे सर्व नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची महत्वाची पदं स्वत:कडे हवीत. आम्ही काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत, विचारांनी एकत्र आलो आहे, पदांसाठी नव्हे असं म्हणणारे मुख्यमंत्रिपदावर अडून आहेत असं त्यांनी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा