“ते शिवसेना भवन राहील नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय” : नितेश राणे

मुंबई : आज माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी “मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नसून मुंबई आमचीही आहे”, असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

“भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे,” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो किंवा कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नसून मुंबई आमचीही आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा