शिवसेना उद्या UPA मध्ये गेली तरी आश्चर्य वाटणार नाही; भाजपाचे टीकास्त्र

मुंबई : नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून उद्या जर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) गेली तरी आश्चर्य वाटणार नाही, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उशीरा का होईना जनतेला संबोधित करत आहेत. ते कुठून बोलतात कसे बोलतात यापेक्षा ते बोलत आहेत हे महत्वाचं आहे, उशीरा असलं तरी गरजेच आहे. तसेच राज्यातील समाजाचा प्रेशर इतका की, सर्वसामान्य माणूस केव्हा ज्याने कधी उंदीरही मारला नाही तो आता आक्रमक होणार आहे. असं टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, व्यापाऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढेल, पुण्यात सकाळी ७ ते ४ दुकाने सुरु आहेत मात्र व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, तास कमी न करता १० ते ७ एवढा वेळ करा तर अस चालणार नाही असे प्रशासनाने म्हटलं आहे. व्यापाऱ्यांनी मला धमकी देऊ नये असे चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा