“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

नाशिक : ऊसाला प्रतिटन 3700 रुपये भावल द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सध्या नाशिक दौऱ्यावर असून, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन खर्चापेक्षा ऊस कमी किमतीत मिळतो. सांगली, कोल्हापूर, सातारा यापेक्षा नगरची स्थिती वेगळी नाही. मात्र, टनामागे पंधराशे रुपयांचा फरक पडतो. असे शेट्टी म्हणाले.

तसेच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कारखाने चौकशी करून सुरू करण्यात यावे. अशी मागणीही त्यांनी केली आहे. साखरेचा क्विंटलमागे 400 ते 500 रूपयांचा भाव वाढला आहे. तसेच इथेनॉलचे देखील भाव वाढले आहेत. असाही ते म्हणाले. तसेच याचदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. परिणामी या दोन्ही नेत्यांवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे.

गृहपाठ न केल्यानं तोंडावर पडावं लागतं. शेतकरी आंदोलन वेगळं आणि इतर आंदोलन वेगळं, अशी जोरदार टीका राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर केली आहे. चळवळ म्हणजे एकप्रकारचा वाघ आहे. या वाघावर स्वार होणं हे सोपं नाही. एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं हे कठीण आहे. पायउतार झालात तर तो वाघच तुम्हाला खाऊन टाकतो, असंही शेट्टी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा