हे तर जालियनवाला बाग हत्याकांडासारखे; लखीमपूर खेरी घटनेचा पवारांनी केला निषेध

नवी दिल्ली : ‘लखीमपूर खेरी’ येथे उत्तर प्रदेशच्या मंत्रीपुत्राने 4 शेतकरी चिरडून मारले. “शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. यादरम्यान झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झालाय.

यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यूपीतील घटनेवर भाष्य केलं. ‘उत्तर प्रदेशातील परिस्थितीची तुलना जालियनवाला बागेतील हत्याकांडाच्या परिस्थितीशी करतानाच, पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं. ‘यूपीमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला, त्यातून भाजपची नियत दिसली आहे,’ अशी जळजळीत टीकाही पवारांनी केली.

तसेच, लखीमपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असून ही घटना जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच आहे, असं शरद पवारांनी बोलुन दाखवलं. तसेच या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकार व उत्तर प्रदेश राज्य सरकार हे अत्यंत असंवेदनशिल असून या घटनेतून सरकारची वृत्ती कळते, असा घणाघात शरद पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा