राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आमची संस्कृती नाही : फडणवीस

मागील सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत:व्हाट्सअँप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता.त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते.

डोनाल्ड ट्रंप यांच्या महाभियोगच्या सुनावणी दरम्यान सिनेटर्सनी चक्क झोपा काढल्या !

या आरोपांचे देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून खंडन केले आहे.’राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असं प्रत्युत्तर फडणवीस आरोप करणाऱ्या नेत्यांना दिले आहे.

Loading...

संजय राऊतांच्या ‘स्टेपनी’च्या वक्तव्यावरून पवार नाराज, म्हणाले…

गृह खात्यानं सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करू असे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी भाजपला धारेवर धरलं आहे. फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर, फोन टॅपिंगची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं मला दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.सध्या या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.