‘सहा-आठ महिने भरपूर शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे म्हणजे…’

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यात यावरून राजकारण चालू आहे. अशातच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांचा समावेश होता.

आपल्या सर्वांना कल्पना आहे, मागील आठवड्यात मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला. त्या निकालाच्या अनुषंगाने आजची आमची ही भेट होती. त्या निकालपत्रावर आम्ही आमची प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं होतं, की त्यात जे सांगितलं गेलेलं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे, राष्ट्रपतींचा आहे आणि साहाजिकच आहे आम्ही राष्ट्रपतींनी व केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी, आमच्या ज्या भावना आहेत. त्या पत्राच्या माध्यमातून तिथं पोहचवण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेतली अलल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेणे म्हणजे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारी कृती आहे. गेले सहा-आठ महिने भरपूर शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे, निवेदन देणे हा सोपा मार्ग वाटला. आता मराठा समाजाला उल्लू बनवणे थांबवा, कायदेशीर खोलात जाऊन कृती करा,’ असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा