‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते.

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

काल ठाण्यात ज्या परप्रांतिय फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यांवर हल्ला केला. ज्या दिवशी तो जेलमधून सुटेल त्या दिवशी आमच्याकडून त्याची मस्ती उतरवत त्याची सर्व बोटे छाटली जातील. पुन्हा त्याला फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. तेव्हा त्यांना कळेल. या फेरीवाल्यांची हिंमत कशी होते?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा