J. P. Nadda | पुण्यात जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक!

J. P. Nadda | पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ( BJP) हालचालीना वेग आला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपने आता आपलं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर केंद्रीत केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिका निवडणुक देखील भाजपसाठी महत्वाची मनाली जातं आहे. तर कालपासून ( 17 मे) आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल मुंबईमधील कार्यक्रमात त्यांनी ठाकरे गटावर तसचं महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तर आज ते पुण्यात राष्ट्रीय कार्यकारिणी कोअर कमिटीची बैठक घेणार असून त्यात राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या हालचालींना वेग

आज (18 मे) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिरात राज्य कार्यकारिणीची बैठक सकाळी 10 ते 5 यावेळेत पार पडणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी असे मिळून 1200 च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. तसचं आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची काय युद्धनीती असेल याबाबत चर्चा होणार असून यामध्ये भाजप पुण्यातील कासब्यात झालेल्या पराभवनंतर कशी पावलं उचलणार याबाबत देखील चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

दरम्यान, पुण्यातील पोटनिवडणुकीच्या चर्चा सध्या शांत झालेली दिसत आली तरीही पोटनिवडणुक देखील भाजपसाठी महत्वाची मानली जातं आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणूक आणि पुणे पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भाजपमध्ये मंत्री,नेते,खासदार, आमदार मैदानात उतरले असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे ही बैठक आणि रणणिती आखणं हे भाजपसाठी जास्त महत्वाचं असणार आहे. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीची एकी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याच्या बैठकीमुळे कर्नाटकमध्ये जसा भाजपचा पराभव झाला तसा महाराष्ट्र देखील होणार असं विरोधी पक्षांकडून बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MDzuLo