Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, कोर्टात हजर राहण्याचा आदेश

मुंबई : प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यावर मनी लाँड्रींग प्रकणात केस सुरु आहे. अशातच तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोर्टाने जॅकलिनला समन्स पाठवलं असून तिला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

सुकेश चंद्रशेखर याने दिले जॅकलिनला 10 कोटीचे गिफ्ट्स

सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) जॅकलिनला 10 कोटीचे गिफ्ट्स दिले होते. हा पैसा 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील असल्याचं ईडीने दाखल केलल्या आरोपपत्रात म्हटलंय. जॅकलिनला या सर्वची माहिती असूनही जॅकलिनने गिफ्ट घेतले. त्यामुळे तिला आरोपी ठरवण्यात आलं आहे.

जॅकलिन फर्नांडिस आणि चंद्रशेखरची एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर व्हायरलः

दरम्यान, काही महिन्यांपुर्वी जॅकलिन आणि चंद्रशेखरची एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या सेल्फीमध्ये चंद्रशेखरला जॅकलिन किस करताना पाहिला मिळालं होतं.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.