‘जाधवांचे वागणे धक्कादायक ; चूप करणे किंवा त्यांच्या अंगावर जाणे योग्य नाही’

मुंबई : रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, असे नेटकरी त्यांना सुनावत आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवुन द्यायचं आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. यावर आता माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हि प्रतिक्रिया दिलीय.

दरम्यान यावर कालपासून विरोधीपक्षांनी जोरदार टीकास्त्र डागलेले आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. ‘नैसर्गिक आपत्ती आल्यावर जनतेमध्ये आक्रोश असतो. याचा अर्थ जनता तुमच्या विरोधात नसते. त्यामुळे राज्यकर्त्यांनी अशावेळी जनतेच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांना फटकारले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्यकर्त्यांनी लक्षात घ्याव, जनतेत आक्रोश असतो त्यावेळी त्यांच्या अंगावर जाणं योग्य नाही. अशा घटना घडतात त्यावेळी जनतेत आक्रोश असतो. जनता तुमच्या विरोधात नसते. त्यांच्यात आक्रोश असतो. तुमच्याशी त्यांना बोलायचं असतं. काही सांगायचं असतं. त्या अपेक्षने ते बोलत असतात.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा