जाधवांचा आवाजच ‘राउडी राठोड’सारखा आहे; चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली. यानंतर यावरून भास्कर जाधव यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर या महिलेने माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी तिने बाजारपेठेत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. जाधव यांनी अरेरावी केली नाही. त्यांचा आवाजच राउडी राठोडसारखा आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे. चिपळूणमधील ती महिला माध्यमांशी बोलताना म्हणाली की, भास्कर जाधव यांचे आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत.

तसेच मुख्यमंत्री भेटीसाठी आले तेव्हा मी खूप भावूक झाले होते. त्यांनी माझ्या मुलाला वडिलधाऱ्या व्यक्तीच्या नात्याने सांगितलं. त्यांनी अरेरावीची भाषा केली नाही. त्यांचा आवाजच राउडी राठोडसारखा आहे, त्यामुळे गैरसमज झाला असेल. ते नेहमीप्रमाणे हातवारे करून बोलत होते, असं देखील या महिलेने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा