InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पवारांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्रा’ ने भाषणाचा शेवट न करता ‘असा’ शेवट केला…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र करत, कोलकात्यात मेगारॅलीचं आयोजन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गुजरातमधील पाटिदार नेते हार्दिक पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व दिग्गज उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. शरद पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये केलेल्या आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी आपल्या भाषणाचा शेवट पश्चिम बंगालच्या जयघोषाने केला.

पवार म्हणाले, “आम्ही आपल्याला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या हक्काचं रक्षण करु, आम्ही एकत्र राहून तुमच्या हक्काचं रक्षण करु. मोदी सरकार बदलण्यासाठी सर्वजण मेहनत घेऊ. आपल्या सर्वांच्या साथीने देशात नवं सरकार आणू. लोकांच्या हिताचं रक्षण करु, हे सांगून मी आपली रजा घेतो, ‘जय हिंद जय बांगला’.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.