James Anderson : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ४०व्या वयातही दाखवतोय युवा खेळाडूंसारखा जोश; पाहा VIDEO!

मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा ४० वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्याच्या घडीला सर्वांनाच माहीत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय सर्वाधिक बळी मिळविणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अलीकडेच बार्मी आर्मीने या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो नेटवर सराव करताना दिसत आहे. सरावाच्या वेळीही अँडरसनला त्याच्या वयाची कसलीही अडचण येत नसल्याचे दिसत आहे. व्हिडिओ मध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट इनस्विंगने तिन्ही यष्टिचीत करून सर्वांनाच वेड लावले आहे.

अँडरसनचा हा व्हिडिओ शेअर करत बार्मी आर्मीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जिमी दुसर्‍या कसोटी मालिकेसाठी तयार होत आहे.’ याशिवाय, हा व्हिडिओ शेअर करताना बारमी आर्मीने त्याचे वर्णन ४० वर्षांचा युवा असे केले आहे. इंग्लिश संघाला २१ ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिका सुरू होण्याआधी अँडरसन नेट्स मध्ये कसून सराव करत आहे. आफ्रिकन संघाविरुद्धच्या मालिकेत इंग्लिश संघासाठी अँडरसनच्या कामगिरीला खूप महत्त्व आहे. तो सध्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांतील सर्वात प्रमुख खेळाडू आहे. अँडरसनने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला देखील बाद केले आहे.

त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने २००३ मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध कारकिर्दीची सुरुवात केली होती. अँडरसनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८५ सामने खेळताना ९४४ बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ६५७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६९ आणि टी-२० क्रिकेटमध्ये १८ बळी आहेत.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.