‘चुकीचा सल्ला देऊ नका’ म्हणत फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान, सध्या जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जान्हवीचा या व्हिडीओत जान्हवी आणि तिचे वडील बोनी कपूर दिसत आहे. यावेळी फोटोग्राफर्स जान्हवी आणि बोनी कपूर यांना मास्क काढायला सांगतात. बोनी कपूर यांनी मास्क काढायल्यानंतर जान्हवी त्यांना ओरडते आणि म्हणते “मास्क काढू नका.” एवढंच नाही तर तिच्या हाताने ती त्यांना मास्क घालू लागली. तर दुसरीकडे फोटोग्राफर्स त्यांना बोलताता “काही होणार नाही.” हे ऐकताच जान्हवी बोलते “उगीच असा चुकीचा सल्ला देऊ नका.”

जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर जान्हवी ‘रुही’ आणि ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. लवकरच जान्हवी ‘गुडलक’, ‘तख्त’, ‘दोस्ताना २’ आणि ‘रणभूमि’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा