जान्हवी कपूरने केली लग्नाची तयारी; पहा असा असेल प्लान

मुंबई : बॉलिवूडमधील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली स्टारकीड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिचे लाखो चाहते आहेत. त्यात आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा ही प्रत्येक चाहत्याला असते. तर जान्हवीने एका मुलाखतीत आतापासून तिच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केल्याचं सांगितलं आहे.

जान्हवीने नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीत जान्हवीने तिच्या बॅचलरेटपासून ते लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी ठरवल्या आहेत. जान्हवीला साधेपणाने लग्न करायचे आहे. तिच्या लग्नाचा सोहळा जास्त दिवसांचा नसला पाहिजे, फक्त दोन दिवसांत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, असं ती जान्हवी म्हणाली आहे.

जान्हवीची बॅचलरेट पार्टी ही कॅप्री किंवा यॉटवर असेल. मेहेंदी आणि संगीतचा कार्यक्रम हा मयलापुरमध्ये तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या घरी असेल. तर लग्न हे तिरुपतीत करण्याची जान्हवीची इच्छा आहे. जान्हवीला रिसेप्शन ठेवण्याची इच्छा नाही.

लग्नाच्या डेकोरेशनबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, “तिला साधेपणा आणि पारंपारिक पाहिजे, तर मोगरा आणि मेणबत्त्यांची सजावट असली पाहिजे. जान्हवी तिच्या लग्नात कांजीवरम साडी नेसेल. तर ब्राइड्समेड म्हणून बहिण खुशी, अंशुला आणि तिची जवळची मैत्रिण तनिषा असेल,” असं ती म्हणाली. तर नवरदेव कसा असेल असा प्रश्न विचारता जान्हवी म्हणाली, “आशा आहे की एक समजूतदार माणूस असेल कारण मी अजून अशा व्यक्तीला भेटली नाही.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा