Jasprit Bhumrah | जसप्रीत बुमराहसाठी BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Jasprit Bhumrah | टीम महाराष्ट्र देशा: देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल  (Indian Premier League IPL) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या दुखापतीबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

बुमराहला पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला पाठवले जाणार (Bumrah will be sent to New Zealand for back surgery)

मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. अशा परिस्थितीत बुमराहला पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला पाठवले जाणार आहे. NCA आणि BCCI ने त्याच्या सर्जरीसाठी न्यूझीलंडच्या एका सर्जनची निवड केली आहे. बुमराच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर देखील उपचार केले आहे.

कमरेच्या दुखापतीमुळे बुमराह (Jasprit Bhumrah) सप्टेंबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीपर्यंत त्याची दुखापत बरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. त्यानंतर तो आयपीएलपर्यंत ठीक होईल असे वाटत असताना, ही मोठी अपडेट समोर आली आहे.

भारतीय क्रिकेट व्यवस्थापन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) ला तंदुरुस्त करण्याचा विचार करत आहे. कारण बुमराह टीम इंडियातील एक प्रमुख खेळाडू आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे.

महत्वाच्या बातम्या