Jasprit Bumrah | मुंबई: टीम इंडियातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बुमराह तंदुरुस्त होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. अशात बुमराहच्या पुनरगमनाची घाई नको, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
रवी शास्त्री म्हणाले, “बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या पुनरगमनाची घाई करणे टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकते. कारण शाहीन आफ्रिदीची दुखापत पूर्ण झालेली नसताना पाकिस्ताननं त्याला खेळवलं होतं. मात्र, त्याला नंतर पुन्हा एकदा पाकिस्तान संघापासून दूर राहावं लागलं होतं. त्यामुळं बुमराहच्या पुनरगमनाची घाई करू नका अन्यथा त्याची अवस्था शाहीन आफ्रिदीसारखी होऊ शकते.”
Bumrah has been away from the cricket field for the past year
पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह (Jasprit Bumrah) गेल्या वर्षभरापासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. मार्च 2023 मध्ये न्युझीलँड येथे त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो आता राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये तंदुरुस्त होत आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज आहे. टीम इंडियाला लवकरच महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहे. यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे बुमराहला खेळवण्याची घाई करण्यात येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये
- IND vs WI | उमरान मलिकला पुन्हा मिळाली टीम इंडियात जागा! वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
- Sanjay Shirsat | अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना परवडणार नाही – संजय शिरसाट
- IND vs WI | वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळालं कसोटी संघात स्थान
- Kishori Pednekar | उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? किशोरी पेडणेकरांची ED चौकशी होण्याची शक्यता
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NtvVqs