Jaundice | काविळाच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Jaundice | टीम महाराष्ट्र देशा: कावीळ ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. शरीरातील सीरम बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे ही समस्या निर्माण होते. कावीळामुळे यकृत (Liver) कमकुवत होऊ शकते. त्याचबरोबर या आजारात त्वचा, नखे आणि डोळे पांढरे किंवा पिवळे पडू लागतात. त्यामुळे बहुतांश लोक या समस्येवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांची सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. हे उपाय केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. काविळाच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

आवळा (Alma-Jaundice)

आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आढळून येतात, जे यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला आवळा कापून त्यामधील बिया काढून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला आवळा मिक्सरमधून बारीक करून रस काढून घ्यावा लागेल. काविळाच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला या रसाचे दिवसातून तीनदा सेवन करावे लागेल. या रसाचे सेवन केल्याने कावळ्याची समस्या दूर होऊ शकते.

लिंबू (Lemon-Jaundice)

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि सायट्रिक ऍसिड आढळून येते, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. लिंबाचे सेवन केल्याने यकृताच्या कार्याला चालना मिळते आणि काविळाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू पाण्याचे सेवन करावे लागेल. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने काविळाची समस्या सहज दूर होऊ शकते.

पपई (Papaya-Jaundice)

काविळाच्या समस्या मात करण्यासाठी पपई उपयुक्त ठरू शकते. पपईचे सेवन केल्याने यकृताचे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर काविळ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही पपईच्या पानांचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला पपईच्या पानांची पेस्ट बनवून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणाचे सेवन केल्याने काविळाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. याशिवाय या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कच्च्या पपईचे देखील सेवन करू शकतात.

काविळाच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील पेयांचे सेवन करू शकतात.

भोपळ्याचा रस (Pumpkin juice-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भोपळ्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पोट थंड राहते आणि शरीर अनेक आजारांपासून दूर होते. या रसामध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, झिंक भरपूर प्रमाणात आढळून येते. भोपळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार होते.

लेमन टी (Lemon Tea-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये लेमन टीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पोट थंड ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया मजबूत बनवण्यासाठी लेमन टी मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, अँटी व्हायरल, अँटीऑक्सिडेंट, विटामिन सी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये नियमित याचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.