‘जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं’ : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : आरएसएस आणि बजरंग दल हे देखील तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जावेद अख्तर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

‘प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्थ आहे. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल,’ अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी अख्तर यांच्यावर केली आहे.

‘राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य मागे घ्यावं’, अशी आक्रमक मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

‘तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला करून अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही काम ही तालिबानसारखेच आहे. त्यामुळे त्यांच्या या कामात भारतीय संविधान आडवे येत आहे, नाहीतर त्यांना संधी मिळाली तर तेही अशा पद्धतीचं क्रूत्य करतील’, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा