‘जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच’ : अतुल भातखळकर

मुंबई : आरएसएस आणि बजरंग दल हे देखील तालिबानी मानसिकतेचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केलं होतं. अशातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग मात्र कट्टरवादीच आहे. त्यांचे वक्तव्य केवळ बेशरमपणा आहे. तुम्ही बहूसंख्य हिंदू समाज असलेल्या देशात राहून तालिबानवर टीका करत आहेत. जावेद अख्तर यांच्यात हिंमत असेल तर ताालिबानमध्ये जाऊन टीका करा. तसेच केलेलं वक्तव्य मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागा, नाहीतर तुमच्या विरोधात बदनामीचा खटला केला जाईल’, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

‘तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला करून अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही काम ही तालिबानसारखेच आहे. त्यामुळे त्यांच्या या कामात भारतीय संविधान आडवे येत आहे, नाहीतर त्यांना संधी मिळाली तर तेही अशा पद्धतीचं क्रूत्य करतील’, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा