Javhavi Kapoor | जान्हवी कपूरची ‘या’ अभिनेत्यासोबत आहे काम करण्याची इच्छा

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेती जान्हवी कपूर (Javhavi Kapoor)चा नुकताच मिली (Mili) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांमधील जान्हवीच्या अभिनयाची विशेष कौतुक होत आहे. त्याचवेळी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये जान्हवीने सांगितली होती की तिला कोणासोबत काम करायचे आहे. तुला ऑनस्क्रीन कोणत्या अभिनेता सोबत काम करायला आवडेल असा प्रश्न रॅपिड फायर राउंड दरम्यान जानवी ला विचारण्यात आला होता. रॅपिड फायर राउंडमध्ये विचारलेल्या या प्रश्नाचे जान्हवी कपूरने क्षणार्धात उत्तर दिले होते.

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) ला करायचे आहे ‘या’ अभिनेत्या सोबत काम

2018 मध्ये धडक या चित्रपटातून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरला एका इंटरव्यू मध्ये रॅपिड फायर राउंड दरम्यान, तुम्हाला कोणत्या अभिनेत्या सोबत काम करायची इच्छा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर जानवी ने कोणताही विचार न करता क्षणार्धात रणवीर सिंग या अभिनेत्याचे नाव घेतले. तिने सांगितले की ऑन स्क्रीन तिची आणि रणवीर सिंग ची जोडी चांगली दिसेल म्हणून तिला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जानवी ने सांगितले की ती तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेकदा रणवीर सिंगचा सल्ला घेत असते.

जान्हवीने पुढे सांगितले की, ” डान्स रियल दरम्यान तिला दुखापत झाली असताना रणवीरने तिला त्यासाठी सल्ला दिला होता. जानवी ला दुखापत झालेली पाहून रणवीरला वाईट वाटले होते. त्याचबरोबर मला दुखापत झालेले असताना रणवीरने मला डान्स शूट करण्यासाठी पाठिंबा आणि हिम्मत दिली होती.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला जान्हवी कपूर (Javhavi Kapoor) दिला होता पाठिंबा

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मधले मैत्री खूप चांगली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगने सोशल मीडियावर त्याचे न्यूड फोटोशूट शेअर केले होते. त्यासाठी सोशल मीडियावर रणवीरला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, जान्हवी कपूरने रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट पाठिंबा दिला होता.

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.