Jayant Patil | अजित पवारांना ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात नाहक बदनाम केले- जयंत पाटील

Jayant Patil | पुणे : पुरंदर पब्लिसिटीतर्फे ‘कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे : अजितदादा पवार’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी भाजपचे नाव न घेता टोला लगावला आहे. सिंचन विभागातील ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवार यांना नाहक बदनाम करण्यात आले असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत.

यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ते म्हणाले, वेळेचे नियोजन आणि स्पष्टवक्तेपणा हे दादांचे गुण आहेत. काम होणार नसेल तर ते परखडपणे सांगतात. १९९० पासून सात निवडणुकांमध्ये मी, अजितदादा, दिलीप वळसे पाटील एकत्र काम करत आहोत. आम्ही सत्तेत असताना माझ्याकडे अर्थमंत्री आणि अजित पवारांकडे कृष्णा खोरे प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती असं पाटील म्हणाले.

शंभर रूपये आवक असताना खर्च ११३ रुपये होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा खोरे प्रकल्पासाठी उद्योजक आणि गुंतवणूकदारांना आम्ही दोघांनी मिळून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. एकमेकांना अडथळा देण्याचे काम विलासराव देशमुख यांच्या काळात कधी झाले नाही. जलसंपदा विभागाच्या कामांसाठी त्यांनी कधी आडकाठी आणली नाही. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले, याचे श्रेय अजित पवार यांच्याकडे जाते. टीका सर्वांवर होते. पण, लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली हे महत्त्वाचे आहे, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमीन सिंचनाद्वारे ओलिताखाली आणून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखविण्याचे काम अजित पवार यांनी जलसंपदामंत्री या नात्याने केले. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले हे महत्त्वाचं असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.