Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा
Jayant Patil | पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकारणात सध्या तुफान चर्चा सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत नाना काटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
जयंत पाटलांचे ट्वीट (Jayant Patil’s Twit)
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
दरम्यान, महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार देऊनही शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत या मुद्द्यावरुन बिघाडी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- #Big_Breaking | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य
- Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य
- Balasaheb Thorat – बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा
- Rain Alert | ऐन फेब्रुवारीत मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ शहरांना हवामान खात्याकडून अलर्ट
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या ‘या’ तारखेला मिळेल 13 वा हप्ता
Comments are closed.