Jayant Patil | जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधान

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीचा हवा असं वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशात जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

I would like to see myself as a civil engineer – Jayant Patil 

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार! पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे.”

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या ट्विटमध्ये इंजिनियर बनवून मोठे प्रोजेक्ट उभी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून जयंत पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद सोडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अमेरिकेला जाऊन सिव्हिल इंजीनियरिंग शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी गृहमंत्री, जलसंपदा मंत्री आणि अर्थमंत्री इत्यादी पद भूषवली आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PsvVcR