Jayant Patil | “देवेंद्र फडणवीस यांना 2024 ला गिफ्ट देऊ” – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणीचं सत्र सुरूच आहे. अशातच “आताचे सर्व सरप्राइज संपले आहेत. आता 2024 ला सरप्राइज देऊ”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटा काढला. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन काय असेल? याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. 2024  ला महाविकास आघाडी सत्तेत येईल, हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राइज असेल.”

भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं सामोरे जाणार? यावर ते म्हणाले, “भाजपनं लोकसभेसाठी मतदारसंघ लक्ष्य केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही. भाजपच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार असेल. 2019 जसं सरप्राइज मिळालं, तसेच पुन्हा 2024 मध्ये मिळेल.”

यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला. “जे जे शिवसेनेला सोडून गेलेत, त्यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे. आता जे 40 सोडून गेलेत, त्यातील सहा सात कसेबसे निवडून येतील, उरलेले सर्व पराभूत होतील”, असे जयंत पाटील म्हणाले. त्याचबरोबर जिथे उद्धव ठाकरे उभे राहतील, तिथे शिवसेनेचा आमदार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.