Jayant Patil | “पहाटेचा ‘तो’ शपथविधी राजकीय खेळी असू शकते, राष्ट्रपती राजवट…”-जयंत पाटील
Jayant Patil | मुंबई : महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. या शपथविधीवरुन मागील 3 वर्षात अनेकदा राजकीय खडके उडाल्याचेही अख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे आणखी एक खळबळ होण्याची शक्यता आहे.
‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते’, असे वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. “मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
“अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदर फुटल्यामुळे सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली, हे नाकारता येणार नाही”, असेही जयंत पाटलांनी सांगितले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकारणात केली जात आहे. जयंत पाटलांच्या या शपथविधी बाबतच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल
- Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा
- Amol Mitkari | “प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामागे मास्टरमाईंड कोण?”; अमोल मिटकरींचा परखड सवाल
- Eknath Shinde | “लोकशाहीत प्रत्येकाला…”; उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- Big Breaking | शिंदे-फडणवीसांची शपथ असंविधानिक; राजभवनकडून धक्कादायक खुलासा
Comments are closed.