Jayant Patil | “‘पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती’ असं मी बोललो नाही” – जयंत पाटील 

Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचं ते म्हणालेत. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता जयंत पाटील यांनी यु-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय.

जयंत पाटील म्हणाले, “पहाटेचा शपथविधी ही खेळी होती, असं मी बोललो नाही. तो एक अंदाज आहे. तो माझा कयास आहे. शरद पवार आम्हाला विचारून पावलं टाकत नाहीत. त्यांनी आम्हाला विचारून निर्णय घ्यावेत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फार ज्युनिअर आहोत.”

“पण शरद पवारांनी एखादी गोष्ट केली तर त्याचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे त्या काळातला घटनाक्रम बघितला तर, त्या घटनेचा फायदा नवीन सरकार स्थापन होण्यास झाला, हे नाकारून चालणार नाही. शरद पवारांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी म्हणालो नाही. पण त्या घटनेचे फायदे काय झाले? हे मी त्यांना सांगत होतो”, असं म्हणत त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

जयंत पाटलांचं वक्त्यव्य काय?

“मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.