Jayant Patil | फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीचा झेंडा! जयंत पाटील म्हणाले, “दलबदलूचे राजकारण…”

Jayant Patil | नागपूर : महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.

शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २२०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ग्रामीण भागातील जनतेने फार मोठ्याप्रमाणावर साथ दिली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दलबदलूचे राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरुपयोग करून देखील महाविकास आघाडीचा पराभव भाजप व शिंदे गट करु शकत नाही हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झाले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

साम-दाम-दंड-भेद वापरूनदेखील महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिंदे गटाचा पराभव केला आहे. हे या आकड्यावरून सिध्द होत आहे. भाजप त्यांच्याबाजूने निकाल लागले आहेत असे बोलत असले तरी चार – साडेचार वाजता निकाल जाहीर व्हायच्या आधीच एकमेकांना लाडू भरवत होते, असे जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.