Jayant Patil | “भिडेंसारखी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासते”; जयंत पाटलांचा खोचक टोला

Jayant Patil | पुणे : संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडे (Sambhaji Bhide) यांना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे”, असं भिडे यांनी म्हटलं. यावरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांन उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, मनोहर भिडे यांचे उद्गार महिलांचा अपमान करणारे आहे. त्याला भारतमातेची पुष्टी जोडणं हे अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील सर्व महिला त्याचा निषेध करतील. अशी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासते आहे. हो महाराष्ट्राच्या महिलांनी नोंद घेणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

पुढे ते म्हणाले, मनोहर भिडे यांचे माझे काही संबध नाही. मी कधी त्यांना भेटायला गेलो नाही. माझ्या आईच्या निधनावेळी रक्षा विसर्जनासाठी आले होते. त्यांनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. अशी प्रवृत्ती सरकार जोपासत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, राज्यातील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ढिम्म बसलेत. राज्यात सुशिक्षित असलेल्या तरुणांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्यात आला असता तर किमान तीन-चार लाख रोजगार आला असता. टाटांना विमान तयार करण्याचा कारखाना तयार करायचं ठरविलं. तीदेखील कंपनी बडोद्याला गेली. या सरकारचा आत्मविश्वास कमी झाला असल्याची टीका पाटलांनी यावेळी केली.

दरम्यान, या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. पोलीस भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. या सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची होती. मात्र त्यातही अडथळे आणले जात आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.