Jayant Patil | मला सर्वांचे फोन आले, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही – जयंत पाटील
Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. ईडी चौकशीनंतर पक्षातील सर्व नेत्यांचा मला फोन आला, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
Ajit Pawar’s call did not come – Jayant Patil
ईडी चौकशीनंतर जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “नाही, मला अजितदादांचा फोन आलेला नाही. मला चौकशीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. मात्र, अजित पवार यांचा फोन आला नाही.”
“चौकशीच्या नावाखाली मला फक्त 9 तास बसवून ठेवलं होतं. मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहे. त्याचबरोबर मी त्यांचं पूर्ण समाधान केलेलं असून त्यांच्याकडे काही प्रश्न शिल्लक राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझं कर्तव्य पार पडलं आहे,” असही ते (Jayant Patil) यावेळी म्हणाले.
दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत असतात. अशात अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन न केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | अजित पवार हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाही; काका बाजूला तर काय होईल?- राज ठाकरे
- Kirit somaiya | लव्हजिहादची मुंबईत घटना समोर; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली माहिती
- WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर
- Mumbai Police | मुंबईत लवकरच बॉम्बस्फोट होणार; मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकीचा मेसेज
- Sharad Pawar | “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत…”; PM पदाबाबत शरद पवारांचा मोठं वक्तव्य
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43iF4Zd
Comments are closed.